

हक्काच्या धान्याचा दर्जा तपासा
पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नयेत; अन्न आयोग अध्यक्षांच्या सूचना
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे धान्य चांगल्या दर्जाचे असावे, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी सोमवारी (ता. २६) जिल्ह्यातील आढावा बैठकीत दिल्या.
जिल्ह्यातील धान्याचे नियतन, उचल व वाटप, तसेच शालेय पोषण आहाराच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळते की नाही, याची खातरजमा करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. रास्त धान्य दुकाने वेळेत उघडली जातात का, तसेच दुकानाच्या दर्शनी भागात ठळक अक्षरांत फलक लावला आहे का, याची तपासणी करावी, असे निर्देश ढवळे यांनी दिले.
आदिवासी वाड्यांवर योजनांची माहिती द्या
पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये. अधिकाऱ्यांनी आदिवासी वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन योजनांची माहिती द्यावी आणि कायद्याच्या चौकटीत लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासावा. पालकांच्या बैठका घेऊन पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करावे. तसेच गरोदर व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृवंदना आणि लेक लाडकी यांसारख्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.