

रायगडसाठी आज अन्नत्याग आंदोलन
शेतकऱ्यांना हेक्टरी लाख, शेतमजुरांना २५ हजारांची मदत देण्याची मागणी
माणगाव, ता. २७ (वार्ताहर) : रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी बुधवारी (ता. २८) माणगाव तहसीलदार कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, तालुकाध्यक्ष राजू रोडेकर यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी विशेष मदत योजना राबवावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
चारा साठवणूक, जलसंधारणावर भर
कोकणातील चारा वणवा लागण्यापूर्वी रोजगार हमी योजनेतून कापून त्याची साठवणूक करावी. गावागावांतील ओढे व नाल्यांवर मातीचे बंधारे बांधण्यासाठी ग्रामसभा घेऊन श्रमदानातून कामे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या कामांत एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे.
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
आर्थिक संकटाचा फटका शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये, यासाठी त्यांची शैक्षणिक फी माफ करावी. तसेच कुंभमेळ्यावरील खर्च कमी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रोडेकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.