श्रमजीवी संघटनेचा भिवंडी ते मंत्रालय

श्रमजीवी संघटनेचा भिवंडी ते मंत्रालय
Published on: 

श्रमजीवीचा मंत्रालयावर मोर्चा
हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेचा एल्गार
भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) ः आदिवासींच्या मूलभूत हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी भिवंडीहून मंत्रालयाकडे ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यात संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ, कार्याध्यक्ष बाळाराम चौधरी, दत्तात्रय कोळेकर, विजय जाधव, अशोक सापटे, सुरेश रेंजांड यांसह ठाणे, पालघर, रायगड नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
वनहक्कांचे दावे निकाली काढण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे दिवे येथून दुपारी मोर्चास प्रारंभ झाला. पहिला मुक्काम खारीगाव या ठिकाणी असणार आहे. यासाठी भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण अंबरनाथ ठाणे, वसई, पालघर डहाणू, तलासरी विक्रमगड वाडा, जव्हार मोखाडा येथून कार्यकर्ते सकाळपासून एकत्रित झाले होते. या वेळी वाहतूक कोंडी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड व वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त क्षीरसागर
यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत दर्जेदार कौशल्यपूर्ण शिक्षण मोफत मिळावे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात विद्या संकुल उभारावेत. आदिवासी समाजाचे प्रलंबित वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ही जल जीवन मिशनच्या योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाणी मुबलक मिळावे, अशा मागण्या असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी दिली आहे. सरकार सकारात्मक चर्चा करते पण निर्णय घेत नाही. त्यामुळे आता सरकार निर्णय घेत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा निर्धार कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com