‘सीआयडी’चे निर्माते बी. पी. सिंह यांचे निधन

‘सीआयडी’चे निर्माते बी. पी. सिंह यांचे निधन
Published on: 

‘सीआयडी’चे निर्माते
बी. पी. सिंह यांचे निधन
मुंबई, ता. २७ : ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंह (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे सिंह यांच्या निधनाची माहिती दिली. सिंह यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
बी. पी. सिंह अर्थात बृजेंद्र पाल सिंह यांनी ‘सीआयडी’ मालिकेच्या माध्यमातून दूरचित्रवाणी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजित या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच त्यांनी यात डीसीपी शमशेर सिंह चित्रोले यांची भूमिकाही साकारली होती. ‘सीआयडी’बरोबरच सिंह यांनी ‘आहट’ या लोकप्रिय भयमालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. सिंह यांच्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवर कॅमेरामन म्हणून झाली होती. पुढे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
---
फोटो
MUM26-F56100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com