भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार द्या

भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार द्या
Published on: 

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध खर्चांवर निर्बंध घातले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांनाही नियमितपणे दिले जाणारे पुरस्कार यंदा वितरित करावेत, अशी मागणी भाजप शिक्षक प्रकोष्ठाचे प्रदेश सहसंयोजक तथा शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बळीराजा देशाला सुजलाम्-सुफलाम् बनविण्यात योगदान देतो, तर शिक्षक भावी पिढीला ज्ञानी आणि सुसंस्कृत घडविण्याचे कार्य करतात. त्यामुळे समर्पित भावनेने काम करणाऱ्या अध्यापक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करणे आवश्यक असल्याचे घागस यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत शिक्षक पुरस्कार वितरणासाठी होणारा खर्च अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक तरतुदींना बाधा न आणता शिक्षकांचा सन्मान करता येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे.
शालेय शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, उच्च व तंत्रशिक्षण तसेच कौशल्य विकास यांसारख्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणीही घागस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com