तलासरीत भ्रष्टाचारविरोधी जनजागृती

तलासरीत भ्रष्टाचारविरोधी जनजागृती
Published on: 

तलासरीत भ्रष्टाचारविरोधी जनजागृती

‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’चा संदेश; तरुणांच्या भूमिकेवर भर

कासा, ता. २८ (बातमीदार) : भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांची जोपासना आवश्यक असल्याचा संदेश पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला. तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २८ ऑक्टोबरला दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष मार्गदर्शन सत्र पार पडले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेतून दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य नीलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सत्रात पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राकेश डांगे यांनी विद्यार्थ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचाराचे सामाजिक दुष्परिणाम आणि त्याविरोधात नागरिकांची भूमिका याविषयी माहिती दिली.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा असल्याचे नमूद करीत त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन केले. भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी असल्यास पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले. या जनजागृती सत्राला विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिक घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com