ऐराेलीतील काळे हत्येप्रकरणी १८ वर्षे न्यायाची प्रतीक्षा

ऐराेलीतील काळे हत्येप्रकरणी 
१८ वर्षे न्यायाची प्रतीक्षा
Published on: 

ऐराेलीतील काळे हत्येप्रकरणी
१८ वर्षे न्यायाची प्रतीक्षा

२३व्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ऐरोलीचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष आनंद काळे यांची हत्या होऊन १८ वर्षे लोटली; तरीही अद्याप या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीवेळी २३व्या तपास अधिकाऱ्याची (आयओ) नेमणूक करण्यात आल्याची माहिती नुकतीच उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने १ डिसेंबरला पहिला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

नवी मुंबईतील ऐरोली येथील काँग्रेसच्या आनंद काळे यांची २१ एप्रिल २००८ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मासळी बाजाराजवळ मोटार उभी करून कार्यालयाकडे जात असताना दोन अनाेळखी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला हाेता.

काळे यांचा मुलगा प्रदीप काळे यांनी अ‍ॅड. किशोर शेट्टी आणि सुधा तंवर यांच्यामार्फत याचिका केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला असून, त्याला राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा दावाही याचिकेत केला आहे. दरम्यान, सरकारने मागील सुनावणीवेळी या प्रकरणाचा तपास करणे याआधीच्या २२व्या तपास अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्या पार्श्वभूमीवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. आयपीएस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्याकडे प्रकरणाचा सोपविण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्या वेळी ते स्वतः न्यायालयात उपस्थित होते. त्याची दखल घेऊन न्यायालयाने शिंदे यांना १ डिसेंबर २०२६ पर्यंत तपासाचा पहिला अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब केली.

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
मागील सुनावणीवेळी सात वर्षांपासून तपास करणाऱ्या पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) भरारी पथकाने आतापर्यंत नेमका काय तपास केला, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि केलेल्या तपासाचा अहवाल मागवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com