

न्यायमूर्तींवर पर्स भिरकण्याचा प्रयत्न
न्यायदालनात एकच खळबळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सुनावणीदरम्यान निकाल विरोधात गेल्याने एका पक्षकार महिलेने चक्क न्यायालयात न्यायमूर्तींवर हातातली पर्स भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उच्च न्यायालयात घडला. घडलेल्या घटनेची तत्काळ दखल घेऊन न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून त्या महिलेला भर न्यायालयातून बाहेर काढले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या क्रमांक ५४ दालनात हा धक्कादायक प्रकार घडला. न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर सुनावणीवेळी आदेश विरोधात गेल्याने अंधेरीस्थित मिंदर गुरमीत सिंग ठुकराल यांनी आपली पर्स न्या. जामदार यांच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न केला. लगेचच त्यांनी स्वतःला सावरले. मात्र, या घटनेने न्यायदालनात एकच खळबळ उडाली. या वेळी ठुकराल कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होत्या. घटनेनंतर त्यांनी त्वरीत लेखी माफीनामा सादर केला. मात्र, त्यांना न्यायालयातून बाहेर काढण्यात आले. माफीनाम्याने न्यायमूर्तींचे समाधान झाले नाही. त्यांनी संबंधित महिला पक्षकारावर दंड आकारण्याचे संकेत दिले आणि तिच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. अत्यंत अयोग्य वर्तन केले असून ते न्यायालयाच्या अवमानास पात्र ठरते. सर्व प्रतिवादींच्या वर्तनाबाबतच्या या अवमान याचिकेची सुनावणी आता ३० ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
...
दबावाला बळी पडणार नाही!
पक्षकारांना ते न्यायालयात काहीही करू शकतात असे वाटते? आपल्या विरोधात आदेश गेला म्हणजे तुम्ही असे वागणार का? अशी नाराजीही न्या. जामदार यांनी व्यक्त करून न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्याच वेळी पक्षकारांपर्यंत एक कठोर संदेश गेला पाहिजे, असे नमूद करून हे न्यायालय कोणत्याही भीतीला किंवा दबावाला बळी पडून कधीही कोणताही आदेश देणार नाही, अशी न्या. जामदार यांनी टिप्पणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.