वसुबारससाठी बाजारपेठा सज्ज

वसुबारससाठी बाजारपेठा सज्ज
Published on: 

ठाणे, ता. ३० (बातमीदार) : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात करणाऱ्या वसुबारस सणासाठी ठाण्यातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून, गाय-वासरांच्या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. वाढते शहरीकरण, गोठ्यांची घटती संख्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्यक्ष गाय-वासराची पूजा करण्याऐवजी अनेक घरांमध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना करून पूजन करण्याची परंपरा रुजत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मातीच्या आणि फायबरच्या मूर्तींना मागणी वाढताना दिसत आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. आश्विन कृष्ण द्वादशीला साजऱ्या होणाऱ्या या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. हिंदू संस्कृतीत गायीला पवित्र मानले जात असल्याने या सणाला विशेष महत्त्व आहे.

फायबरच्या मूर्तींना अधिक पसंती
वसुबारसच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठांमध्ये गाय-वासराच्या विविध आकारांतील आणि प्रकारांतील मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. वाढते शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे वसुबारसला घरच्या घरी गाय-वासराच्या मूर्तींची पूजा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुेळ ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मातीच्या तसेच फायबरच्या मूर्ती उपलब्ध असून, टिकाऊपणा आणि आकर्षक स्वरूपामुळे फायबरच्या मूर्तींना अधिक मागणी आहे, अशी माहिती मूर्तिकार संपदा पातकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.