

स्थानकांवर औषधांच्या सुविधाचा अभाव
समस्या दूर करण्याची उमाशंकर सिंह यांची मागणी
उल्हासनगर, ता. २९ (बातमीदार) : रेल्वे प्रवासादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर औषधांची दुकाने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस मित्र तथा समाजसेवक प्रमोद नाथा जोशी यांनी यासंदर्भात उल्हासनगर रेल्वे प्रबंधक उमाशंकर सिंह यांना निवेदन दिले आहे.
दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान डोकेदुखी, ताप, चक्कर येणे, उलट्या, पोटदुखी किंवा किरकोळ दुखापतींसारख्या समस्या उद्भवल्यास तातडीने औषधे आणि प्रथमोपचार साहित्य मिळणे आवश्यक असते, मात्र अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, दिव्यांग आणि नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर बनते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संख्या, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्थानकांवर औषधांची दुकाने सुरू करावीत. शक्य असेल तेथे चोवीस तास औषधे उपलब्ध करून द्यावीत. आवश्यक औषधांसह पट्ट्या, मलम आणि प्रथमोपचार साहित्यही उपलब्ध असावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना ‘कायद्याने वागा लोकचळवळी’चे प्रणेते राज असरोंडकर, भाजपचे महासचिव राजेश गणेजा, ज्येष्ठ शिवसैनिक बाबा केळुसकर आणि समर्पण संस्थेचे अध्यक्ष मनोज कोरडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.