साकेतजवळ पिकअपमधून दोन टन मांस जप्त

साकेतजवळ पिकअपमधून दोन टन मांस जप्त
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : राबोडी परिसरातील साकेत मैदानाजवळ गोमांस असल्याच्या संशयातून नागरिकांनी पकडलेल्या पिकअप वाहनात सुमारे दोन टन मांस आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राबोडी पोलिसांना आज (ता. २९) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गोदावरी बस थांब्यासमोर, साकेत मैदानाजवळ नागरिकांनी मांसाने भरलेले वाहन पकडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पिकअप (क्र. एमएच ०४ एनबी ३४८१)मधून रक्तासारखा द्रव पदार्थ बाहेर पडत असल्याचे दिसून आले. चालक वाहनाचे दरवाजे बंद करून निघून गेल्याने त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नाही. पोलिसांनी वाहन टोइंग करून राबोडी पोलिस ठाण्यात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांच्या उपस्थितीत वाहनाचा मागील दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी आत पशुधनाची १४ मुंडकी आणि अंदाजे दोन टन मांस आढळले. मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, याबाबत पशुवैद्यकीय तपासणीचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.

वाहनाच्या नोंदणीवरून मालकाशी संपर्क साधला असता, त्याने पप्पू खान याला वाहन चालवण्यासाठी दिल्याची माहिती दिली. वाहनाची किंमत पाच लाख, तर त्यातील मांसाची अंदाजित किंमत चार लाख असल्याचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com