

श्रमदानातून वनराई बंधारे; जलसंवर्धनाला बळ
सायवन, हुंबाचापाड्यात लोकसहभागातून उपक्रम
कासा, ता. २९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सायवन आणि चळणी ग्रामपंचायत हद्दीतील हुंबाचापाडा येथे श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात आले. सायवन येथील सोनय नदीवर दोन, तर हुंबाचापाडा येथे एक बंधारा उभारून ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सायवन येथे पंचायत समिती डहाणू आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला, तर हुंबाचापाडा येथे चळणी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदान केले. हुंबाचापाडा येथील बंधाऱ्यासाठी कृषी विभागाने आवश्यक पिशव्या उपलब्ध करून दिल्या.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनास मदत होण्याची अपेक्षा आहे.
सायवन येथे सरपंच विष्णू बोरसा, उपसरपंच महेश रिंजड, ग्रामपंचायत सदस्य योगनधारा गावित, वनविभागाचे कर्मचारी, केंद्रप्रमुख सुरेश भोये, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ सहभागी झाले. हुंबाचापाडा येथे सरपंच सरिता सुरेश भोये, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद गजानन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पेसा व वन हक्क समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.