धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध

धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध
धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध
धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध
Published on: 

धारावीतील पादचारी पूल बंद करण्यास विरोध
आमदार तामील सेल्वम यांचा हस्तक्षेप; पर्यायी मार्गाची व्यवस्था होईपर्यंत पूल सुरू ठेवण्याची मागणी
धारावी, ता. २९ (बातमीदार) : धारावीतील ट्रान्झिट कॅम्पमधील धोबी घाटाजवळून सायन येथील जैन सोसायटीकडे जाणारा पादचारी पूल बंद करण्याचा महापालिकेचा प्रयत्न बुधवारी (ता. २९) स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला. सायन कोळीवाडा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कॅप्टन तामील सेल्वम यांनी पूल बंद करण्यास तीव्र विरोध केल्याने पालिकेच्या ग/उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याशिवाय सध्याचा पूल बंद करू नये, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
या पुलावरून धारावी, सायन, सायन कोळीवाडा आणि किंग्ज सर्कल परिसरात जाण्यासाठी दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. सायन रुग्णालयासह लायन्स क्लब रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसाठीही हा जवळचा मार्ग आहे. डी. एस. हायस्कूल, गौरीदत्त मित्तल शाळा, एसआयईएस महाविद्यालय आणि पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी या पुलाचा नियमित वापर करतात. त्यामुळे पूल बंद झाल्यास विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यापूर्वी १६ सप्टेंबर रोजीही पालिकेने पूल बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. बुधवारी पुन्हा पालिकेचे अधिकारी पूल बंद करण्यासाठी आले असता, नागरिकांनी एकत्र येत विरोध दर्शवला. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. धारावी तालुका अध्यक्ष एन. आर. पॉल यांनीही पूल बंद करण्यास विरोध दर्शवला. “पालिकेने गुपचूप पूल बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू. नागरिकांना त्रास होईल, असे रेल्वे आणि पालिका प्रशासनाचे कोणतेही काम खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनीही पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याशिवाय पूल बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे.

पर्यायी मार्गाची मागणी
आमदार कॅप्टन तामील सेल्वम म्हणाले, “जैन सोसायटीकडे जाणारा हा पूल परिसरातील नागरिकांसह शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोयीचा मार्ग आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतो. पर्यायी मार्गाची व्यवस्था होईपर्यंत पूल बंद करू नये, अशी सूचना मी पालिका प्रशासनाला केली आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com