

दिवाळी बाजारातून महिलांना रोजगार
उल्हासनगर, ता. २९ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेतर्फे बचत गटांतील महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी यंदा दोन ठिकाणी दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. महापौर अश्विनी निकम आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीना सोंडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजारात ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून ८० महिलांना व्यवसायाची संधी मिळणार आहे.
पश्चिमेकडील कॅम्प क्रमांक दोनमधील गोलमैदान आणि पूर्वेकडील व्हीटीसी मैदान येथे प्रत्येकी २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर दोन महिलांना व्यवसाय करता येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत लॉटरी पद्धतीने स्टॉलसाठी महिलांची निवड केली जाणार आहे. महापौर, आयुक्त, उपायुक्त अनंत जवादवार, सभापती मीना सोंडे आणि विभागप्रमुख यशवंत सगळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
२ ते ७ नोव्हेंबरदरम्यान भरणाऱ्या या बाजारात महिला स्वतः तयार केलेले लाडू, पेढे, करंज्या, चकली, चिवडा यांसह दिवाळीचे विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःच्या उत्पादनांची विक्री करून उत्पन्न मिळविण्याची संधी मिळणार आहे.
बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, तसेच सहकुटुंब दिवाळी बाजाराला भेट द्यावी, असे आवाहन सभापती मीना सोंडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.