द्रोणागिरीत अतिक्रमणांवर कारवाई

द्रोणागिरीत अतिक्रमणांवर कारवाई
Published on: 

द्रोणागिरीत अतिक्रमणांवर कारवाई
टपऱ्या, हॉटेल्स जमीनदोस्त; अनधिकृत पार्किंग, भंगार दुकानांकडे लक्ष कधी?
उरण, ता. २९ (बातमीदार) : द्रोणागिरी सीएफएस परिसरातील सिडकोच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, हॉटेल्स आणि कँटीनच्या बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. या मोहिमेत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, मात्र याच भागातील अनधिकृत पार्किंग आणि भंगार दुकानांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
द्रोणागिरी परिसरातील सिडकोच्या मोकळ्या जागांवर अनेक वर्षांपासून पक्की बांधकामे, झोपड्या, टपऱ्या आणि हॉटेल्स उभारण्यात आल्याचे चित्र आहे. या अतिक्रमणांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता कारवाई झाल्याने संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, परिसरात सिडकोच्या जागांवर अनधिकृत पार्किंग व्यवसाय आणि भंगाराची दुकाने सुरू असल्याचे दिसून येते. रस्त्यांच्या कडेला अवजड वाहने बेकायदेशीररीत्या उभी केल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. परिणामी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत आहे. जेएनपीए आणि सीएफएसशी संबंधित अवजड वाहतुकीसाठी हा परिसर महत्त्वाचा असल्याने येथील अनधिकृत व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सर्व अतिक्रमणांची तपासणी होणार का?
टपऱ्या आणि हॉटेल्सवर कारवाई केल्यानंतर सिडकोने अनधिकृत पार्किंग, भंगार दुकाने आणि इतर बांधकामांचीही तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निवडक अतिक्रमणांपुरती मोहीम मर्यादित न ठेवता सर्व अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होणार का, हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com