सह्याद्रीचा वारसा विकण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न

सह्याद्रीचा वारसा विकण्याचा 
महायुती सरकारचा प्रयत्न
Published on: 

सह्याद्रीचा वारसा विकण्याचा
महायुती सरकारचा प्रयत्न
भीमाशंकरच्या जंगलतोडीची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन वारसा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर भाजप महायुती सरकारने कुऱ्हाड चालवली आहे. भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मनसुबे हाणून पाडू. वेळप्रसंगी कर्जत भीमाशंकरच्या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
टोरंट कंपनीसाठी कर्जत भीमाशंकरच्या जंगलात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्यानंतर स्थानिकांशी संवादही साधला. या वेळी सपकाळ म्हणाले की, टोरंट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा संकल्प केला असताना महाराष्ट्रात झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधानांचा संकल्प आम्ही आज कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण करून पूर्ण केला.

कर्जत भीमाशंकरच्या जंगलात होत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या प्रकल्पातून हजारो रोजगार निर्माण होतील. या वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावू या केवळ पोकळ घोषणा आहेत. याआधी याच सरकारने ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्याचे काय झाले? यातील एकही झाड कोणी पाहिले नाही. हा प्रकल्प अत्याधुनिक असल्याचे सरकार सांगत आहे, मग हजारो रोजगार कुठून येणार? मुळात भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. ते महाराष्ट्राची दिशाभूल करत असून, फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत.

निकालाने सत्तेचे गर्वहरण झाले
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकून महायुती सरकारचा धुव्वा उडवला. निकाल सुरू असतानाच घाईघाईत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला हिनवणारे ट्विट केले होते; पण निकाल येताच हे ट्विट त्यांना डिलीट करावे लागले. फडणवीस यांनी स्वतः नागपूरच्या निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली होती. तेथेच त्यांचे नाक कापले आहे, हा निकाल परिवर्तनाची नांदी आहे, असेही सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com