गिरणी कामगारांचे उपोषण सुरूच

गिरणी कामगारांचे उपोषण सुरूच
Published on: 

गिरणी कामगारांचे उपोषण सुरूच
थकीत वेतनासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा दीड महिन्यापासून लढा; दिवाळीपूर्वीही व्यवस्थापनाची उदासीनता
शिवडी, ता. २९ (बातमीदार) ः राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगारासाठी ७ सप्टेंबरपासून सुरू असलेले साखळी उपोषण अद्याप निर्धाराने सुरूच आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारची पुन्हा भेट घेण्याची ग्वाही संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या ७९ व्या वर्धापनदिनी बोलताना दिली आहे. याप्रश्नी एनटीसी व्यवस्थापनाने मात्र तसा कोणताच प्रयत्न केलेला दिसत नाही. दिवाळी सण अगदी तोंडावर आला तरी व्यवस्थापन कोणतीही सकारात्मक हालचाल करताना दिसत ‌नाही. ‌
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगारांनी बेलार्ड पियर येथील एनटीसीच्या प्रधान कार्यालयावर एल्गार पुकारून, या प्रश्नावरील आपला संताप व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला होता. व्यवस्थापनाने थातूरमातुर योजना पुढे करून ‌‌वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाची ही तात्पुरती मलमपट्टी अमान्य केली आणि कामगारांचे आंदोलन चालूच ठेवले आहे. राष्ट्रीय मिल मजूर संघाने औद्योगिक न्यायालयाची दारे ठोठावली होती. न्यायालयाने कामगारांना ‌मागील सर्व थकीत पगार देण्याचा, निर्णय अलिकडेच दिला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने ‌मैदानात‌ आणि न्यायालयीन मार्गाने कामगारांच्या हक्कासाठीचा लढा सुरूच ठेवला आहे.
मुंबईतील टाटा, इंदू मिल क्रमांक ५, पोदार आणि दिग्विजय ‌या पएनटीसीच्या चार गिरण्यांवर खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर आणि सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली गिरण्यांवर लढा सुरू आहे. संघटन सेक्रेटरी दीपक राणे, गजानन कदम, बबन आसवले, प्रकाश भोसले आदी कार्यकर्ते हा लढा पुढे नेत आहेत. महिला प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला आपला सक्रिय पाठिबा व्यक्त केला आहे. हा लढा सुरू होऊन दीड महिना केव्हाच उलटून गेला आहे! परंतु कामगार न्याय मागणी ‌पूर्ण होईपर्यंत चिवटपणे लढत राहणार आहेत, हेच चित्र आज या लढ्यामधून दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com