आजार आणि आर्थिक टंचाईला कंटाळून विरार मध्ये तीन भावा बहिणीची आत्महत्या

आजार आणि आर्थिक टंचाईला कंटाळून विरार मध्ये तीन भावा बहिणीची आत्महत्या
Published on: 

विरारमध्ये तीन भावंडांची आत्महत्या
आजार-आर्थिक टंचाईला कंटाळून टोकाचे पाऊल
नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) ः विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये दोन भाऊ आणि बहिणीचा मृतदेह राहत्या घरात अढळला. गार्डन के एवेन्यू मधील १२ व्या मजल्यावर ही घटना घडली. मृतदेहांना दुर्गंधी सुटल्यानंतर बुधवारी (ता. २८) ही घटना उघड झाली. मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ पोलिसांना मिळाल्यानंतर याचे कारण स्पष्ट झाले. आजार आणि आर्थिक टंचाईला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध पिऊन तिघांनी एकत्र आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याबाबत बोळिंज पोलिस तपास करीत आहेत.
दीपेश (वय ५२), कुमार (५०)आणि खेवणा मेहता (४८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. कुमार अनेक वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होता. तर दीपेशला लकवा होता. या दोन्ही भावांची जबाबदारी बहीण खेवणा हिच्यावर होती. ते चार वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते. आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून तिघांनी राहत्या घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
उपचारासाठी मोठ्या भावाने ४० हजार मागितले होते, पण आमचीही परिस्थिती नसल्याने आम्ही १० हजार दिले होते. रात्री पोलिसांनी फोन केल्यानंतर आम्हाला ही घटना कळाली.
- फाल्गुनी जोशी, मृताची बहीण
----------------------
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला एक मोबाईल मिळाला. त्यात मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ असून, त्यात आजार आणि आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे. आम्ही याबाबत गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत.
- प्रकाश कावळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोळिंज पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com