

बारा वर्षे विभक्त राहणे हा मानसिक छळच
घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचा निर्वाळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : पती-पत्नीमधील दीर्घकाळाची विभक्तता ही मानसिक क्रूरता ठरू शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि पतीला घटस्फोट नाकारणारा २०१९ मधील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला.
अर्जदार पत्नीपासून मागील १२ वर्षांपासून विभक्त राहत आहे. या दाम्पत्याचा विवाह आता पूर्णपणे मोडकळीस आला असून, तो पुन्हा सावरणे शक्य नाही. अशातच वर्षानुवर्षे पती-पत्नीमधील संबंध अधिक कटू आणि संघर्षपूर्ण झाले आहेत. विस्कळित झालेल्या वैवाहिक नात्याचे केवळ बाह्य स्वरूप टिकवून ठेवणे म्हणजे दोघांवरही अन्याय करण्यासारखे आहे, असेही निरीक्षण न्या. भारती डांगरे आणि न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने पतीला घटस्फोट मंजूर करताना नोंदवले.
पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत दोन्ही बाजूंच्या दाव्यांमध्ये पूर्णपणे परस्परविरोधी भूमिका असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. दाम्पत्याचे वैवाहिक नाते आता दुरुस्तीपलीकडे गेले असल्याचे निरीक्षणही नोंदवले तसेच पतीने क्रूरता आणि परित्यागाची बाब सिद्ध केल्याचे नमूद करून न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
...
प्रकरण काय?
कौटुंबिक न्यायालयाने २०१९ मध्ये घटस्फोट नाकारण्याच्या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबईतील मानखुर्दस्थित ३१ वर्षीय तरुणाचा २०१३ मध्ये २५ वर्षीय तरुणीशी बौद्ध पद्धतीने विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने दोघांचे संबंध चांगले होते, मात्र त्यानंतर त्यांच्यातील मतभेद वाढत गेले. पत्नीच्या गर्भपातासाठी पतीलाच जबाबदार धरल्याचा दावा पतीकडून करण्यात आला. सप्टेंबर २०१४ मध्ये पत्नीने त्याला सोडून माहेर गाठले आणि त्यानंतर ती परत आली नसल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे.
...
व्हॅलेंटाइन डेला वादात भर
व्हॅलेंटाइन डेला पत्नीने आपण दुसऱ्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले, मात्र पत्नीने नंतर हे विधान नाकारले. दाम्पत्यातील वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पत्नीने दाखल केलेली अदखलपात्र (एनसी) तक्रार आणि नवी मुंबई पोलिसांच्या महिला व बालकांसाठीच्या विशेष कक्षात केलेली फौजदारी तक्रार यांमुळे समेटाच्या प्रयत्नांत आणखी अडथळे निर्माण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.