ॲनिमेशनमधून कथाकथनाचा अनुभव

ॲनिमेशनमधून कथाकथनाचा अनुभव
Published on: 

ॲनिमेशनमधून कथाकथनाचा अनुभव
घाटकोपरच्या पी. एन. दोशी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनानिमित्त विशेष प्रदर्शन
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) ः एस. पी. आर. जे. कन्याशाला संचालित श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयातील देवीलाबेन मेहता डिपार्टमेंट ऑफ बी.ए. मास कम्युनिकेशनच्या सिनेपीडिया क्लबतर्फे ॲनिमेटेड लघुपट प्रदर्शनाचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस साजरा करण्यात आला.
चित्रपट निर्मितीतील तंत्रज्ञान आणि कथाकथनाचे विविध प्रकार वि‌द्यार्थ्यांना जवळून अनुभवता यावेत यासाठी श्रीमती देवीलाबेन मेहता बी.ए. मास कम्युनिकेशन विभागातर्फे बुधवारी (ता. २८) एका खास ॲनिमेटेड लघुपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सिनेपीडिया क्लबच्या पुढाकाराने आयोजित हा उपक्रम मल्टिमीडिया लॅबमध्ये पार पडला.
आजच्या आधुनिक जनसंवाद क्षेत्रात व्हिज्युअल स्टोरीटेलिंग म्हणजेच दृकश्राव्य कथाकथनाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ॲनिमेशनच्या माध्यमातून भावना, विचार आणि कथा कशा प्रकारे प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात, याचे प्रत्यक्ष आकलन वि‌द्यार्थ्यांना व्हावे, या उपक्रमामागील मुख्य उ‌द्देश होता.
या प्रदर्शनादरम्यान वि‌द्याथ्यीनी विविध ॲनिमेटेड लघुपटांचा आस्वाद घेत त्यातील तांत्रिक बाजू आणि सर्जनशील दृष्टिकोन समजून घेतला. मास कम्युनिकेशनच्या वि‌द्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, चित्रपटांकडे संवादाचे एक सशक्त माध्यम म्हणून पाहण्याची नवी दृष्टी या उपक्रमामुळे मिळाली.
वि‌द्यार्थ्यांमध्ये चित्रपट रसास्वाद आणि निर्मितीची आवड निर्माण करण्यासाठी सिनेपीडिया क्लब अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे नियमित आयोजन करत असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमाला विद्याथ्यर्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अनोख्या उपक्रमाची संकल्पना मास कम्युनिकेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. निमिषा कांबळी यांची असून ॲनिमेशनच्या प्राध्यापिका सबीहा खान आणि हेत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेपीडिया क्लबच्या अध्यक्ष ॲना नाडार आणि मास कम्युनिकेशन विभागातील इतर विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.