

कल्याण, ता. ३० (बातमीदार) : शहराच्या पश्चिमेकडील ६९ वर्षीय सेवानिवृत्ताला जम्मू-काश्मीरमध्ये मनी लाँड्रिंगचा व दहशतवादी कारवायांसाठी बँक खाते वापरल्याचा बनावट धाक दाखवून तब्बल सहा लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून सायबर गुन्हे शाखेने व स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणारे दत्तात्रय काशिनाथ बोपर्डीकर हे खासगी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, १७ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल आला. समोरील व्यक्तीने, तुमच्याविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला असून, त्याची चौकशी करण्यासाठी दोन तासांच्या आत एटीएस पोलिस ठाण्याला हजर राहा, अन्यथा तुम्हाला तातडीने अटक करण्यात येईल, अशी भीती घातली.
चोरट्यांनी खोट्या कागदपत्रांचा धाक दाखवत पुढे ‘आयपीएस मनोज कुमार शर्मा’ यांच्या नावे असल्याचे सांगून व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यास भाग पाडले. सायबर ठगांनी फिर्यादीवर सातत्याने दबाव वाढवत त्यांची कसून चौकशी सुरू केली. चोरट्यांच्या सततच्या मानसिक दबावाला बळी पडून बोपर्डीकर यांनी २३ ऑक्टोबरला आरटीजीएसद्वारे साडेसहा लाख पाठवले. पैसे वळते झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
एकांतवासात राहण्याच्या सूचना
तुमच्या खात्यातून दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यात आली आहेत का, हे पाहण्यासाठी आम्हाला आरबीआयकडे विनंती करावी लागेल, असे सांगून त्यांना घरातच एकांतवासात राहण्यास आणि ही बातमी कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी व सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी आरबीआयचे आदेश असल्याचे भासवून त्यांची मुदत ठेव मोडण्यास लावली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.