मुंब्र्यात एमडीचा कोट्यवधींचा साठा जप्त

मुंब्र्यात एमडीचा कोट्यवधींचा साठा जप्त
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मुंब्रा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी धडक मोहीम राबवत असताना, सम्राटनगर परिसरातून टांझानिया देशातील चार नागरिकांना अटक केली आहे. या छाप्यात तब्बल एक कोटी ५० लाख २७ हजारांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. त्या चौघांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३०) ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे मुंब्र्यातील अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मुंब्रा परिसरात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेऊन परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. २८) मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनायक माने आणि त्यांच्या पथकाला सम्राटनगर परिसरात काही परदेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान हरीओम इमारतीत काही टांझानियन नागरिक वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३५२.५ ग्रॅम वजनाची ३५ लाख २५ हजार रुपये किमतीची एमडी पावडर, तसेच एक किलो १४६ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त करण्यात आली. याशिवाय मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले. रशीद मुजम्मिल सईदी, हसन न्युमबे अली (३४), केव्हीन अडोल्फ वोसा (२६) आणि ओबीअली अलेक्स झेंडर वीडीबेरे (३४) यांना गुरुवारी (ता. २९) अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.