

मुंब्र्यात वर्षभरात ३९ तस्करांवर गुन्हे
३२ कोटींचे अमली पदार्थ जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मुंब्रा परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. झेंडेवाला बाबा परिसरातील इराणी वस्तीत गस्त घालत असताना मुंब्रा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने १८ वर्षीय तरुणाला गांजासह अटक केली. साहिल सिराज शेख असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून एक किलो ३८४ ग्रॅम वजनाचा आणि २८ हजार २२९ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, २०२६ या वर्षात मुंब्रा पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीप्रकरणी ३९ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून, सुमारे ३२ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथक इराणी वस्तीत गस्त घालत असताना साहिल संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली; मात्र त्याच्या उत्तरांवर समाधान न झाल्याने अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे गांजा आढळून आला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, विक्रेत्यांसोबतच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. सोसायट्यांचे आवार, रिक्षा, रिक्षा पार्किंग, निर्जन ठिकाणे, बायपास रस्ता आणि मोकळ्या मैदानांमध्ये गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६३५ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९१२ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.