बॅटरीद्वारे १००० मेगावॉटचा वीज पुरवठा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

बॅटरीद्वारे १००० मेगावॉटचा वीज पुरवठा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
Published on: 

बॅटरीतून १,००० मेगावॉट वीज वितरण
दिवसभर साठवलेल्या विजेचा सायंकाळी पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी उभारलेल्या सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पात तयार झालेली अतिरिक्त वीज आणि ग्रीडद्वारे उपलब्ध झालेली स्वस्ताची सौरऊर्जा महावितरणकडून बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी जास्त वीज मागणीच्या वेळी वितरित केली जात आहे. सध्या महावितरणने १,००० मेगावॉटचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे विकेंद्रित स्वरूपात बॅटरीचा वापर करून एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज वितरण करणारे महावितरण आणि पर्यायाने महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरले आहे.
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे सात हजार मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज कृषी पंपांना देण्यात येते. अतिरिक्त वीज बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी कमाल वीज मागणीच्या वेळी उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम (बीईएसएस) योजनेत ५०० मेगावॉट क्षमतेची बॅटरी साठवणूक क्षमता नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यातून दोन तास वीजपुरवठा होणार असल्याने १,००० मेगावॉट अवर इतकी बीईएसएस क्षमता उपलब्ध झाली असल्याचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे. सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वाढलेल्या वीजमागणीच्या काळात हा वीजपुरवठा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

४००० मेगावॉटचे काम सुरू
महावितरणने एकूण ७५० मेगावॉट क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प उभारण्याची योजना सुरू केली असून, त्यातून दोन तासांसाठी प्रत्येकी ७५० मेगावॉट अर्थात एकूण १,५०० मेगावॉट अवर वीज उपलब्ध होईल. त्यापैकी १,००० मेगावॉट अवर काम पूर्ण झाले आहे. ऊर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. याखेरीज ४,००० मेगावॉट अवर क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे सायंकाळी उच्चांकी मागणीच्या वेळी हमखास वीज उपलब्ध होणे आणि बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरात उपलब्धता असे दोन लाभ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.