

नवी मुंबईत २० वर्षे करवाढ नाही!
वनमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही; कामगारांची दिवाळी गोड
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईकरांवर आगामी २० वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही वाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देतानाच महापालिका कामगारांचे कल्याण आणि शहराचा विकास यांना समान प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेतील सर्व आस्थापनांमधील आणि परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांना सात हजार ५०० रुपयांचा विशेष सानुग्रह लाभ आणि दिवाळीनिमित्त ४५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल श्रमिक सेना युनियनच्या वतीने गणेश नाईक यांचा सत्कार आणि वचनपूर्ती कामगार मेळावा वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला. या वेळी श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव नाईक, उपाध्यक्ष संदीप नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश नाईक म्हणाले, की १९९५ पासून नागरिकांनी नवी मुंबईच्या विकासासाठी विश्वास दाखवला. शिक्षण, आरोग्य, परिवहन, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यानांसह विविध क्षेत्रांत दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे. भविष्यातही परिस्थितीनुसार कामगारांच्या वेतनात वाढ केली जाईल. डॉ. संजीव नाईक यांनी श्रमिक सेनेच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामगारांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. महापौर सुजाता पाटील यांनी हा निर्णय कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वाधिक सानुग्रह अनुदान देणारी नवी मुंबई महापालिका असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.