झाडांना रोषणाईचा फास

झाडांना रोषणाईचा फास
Published on: 

झाडांना रोषणाईचा फास
पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : सण-उत्सवांच्या काळात झाडांवर विद्युत दिव्यांच्या माळा, वायरिंग आणि सजावटीचे साहित्य लावण्याच्या प्रकारांमुळे झाडांसह त्यावरील पक्षी, कीटक व अन्य जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. जिवंत झाडांवरील विद्युत रोषणाई आणि सजावटीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेने मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी निवेदन वन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वर्ग केले आहे.

ठाणे शहरात सण-उत्सवांच्या काळात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांवर विद्युत दिव्यांच्या माळा, वायरिंग आणि सजावटीचे साहित्य लावले जाते. त्यामुळे झाडांच्या सालीला इजा पोहोचण्याबरोबरच त्यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच झाडांवर आश्रय घेणारे पक्षी, कीटक आणि अन्य सजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. झाडे ही केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारी नसून पर्यावरणीय संतुलन आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदन वन विभागाकडे पाठविल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत सिनकर यांनी दिली. आता याप्रकरणी वन विभाग काय भूमिका घेतो, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

कोट
झाडांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. विद्युत रोषणाईच्या नावाखाली झाडांना आणि निसर्गाला हानी पोहोचविण्याचा अधिकार कोणालाही नाही.
- प्रमोद सालसकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.