महावितरणचा वीजचोरांना दणका

महावितरणचा वीजचोरांना दणका
Published on: 

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : महावितरणच्या वीजवाहिनीवर थेट टॅपिंग करून विनापरवाना वीज वापरणाऱ्यांविरोधात महावितरणने धडक कारवाई केली आहे. अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी आणि पालेगाव परिसरात केलेल्या तपासणीत वीजचोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी एकूण ११ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश मनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पहिल्या प्रकरणात लोकनगरी परिसरातील स्टार स्क्रॅपमधील जमील मजीद शेख, नाना हेअर कटिंग सलूनमधील संकेत राऊत, विधी फूड अँड ज्यूस सेंटरमधील अमित भाग, शुभांगी इंजिनिअरिंग वर्क्समधील पुरुषोत्तम पाटील, गरीब नवाज चिकन शॉपमधील रियाझ शेख आणि बालाजी ड्रेसेसमधील अमन थापा या सहा जणांनी सर्व्हिस वायरला थेट टॅपिंग करून अनधिकृत वीज वापरल्याचे तपासणीत आढळले.
दुसऱ्या प्रकरणात पालेगाव परिसरातील ओम साई रेसिडेन्सीमधील मनोज कुमार यादव, पनवेलकर क्लासिकमधील कॉन्टिनेंटल प्लांटचे नीरज शाह, राघे गोविंद प्लाझा येथील टी विंगचे चेअरमन, रोजबेरी पनवेलकर प्रेस्टीजमधील रोहन कोतकर आणि परशुराम वेदांतमधील सुमित सुरेश गायकवाड या पाच जणांविरोधात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांत सहाय्यक अभियंता योगेश मनोर यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील भदाणे यांच्या माध्यमातून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. थेट वीजवाहिनीवर टॅपिंग करून वीज वापरल्याने महावितरणचे आर्थिक नुकसान होत असल्याने अशा प्रकारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.