

राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई
पाच खेळाडूंची इंडोनेशियाच्या स्पर्धेसाठी निवड
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या १३व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. या स्पर्धेत प्रिन्स जाधव, केतन सुरवडे, श्रवण मिरकुटे, पलक्ष केणे आणि सोहम सिंग या पाच खेळाडूंनी पदकांची कमाई केली. त्यांची या कामगिरीच्या जोरावर इंडोनेशिया येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता हे पाचही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेत प्रिन्स जाधव याने गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. श्रवण मिरकुटे याने लांब उडीमध्ये अव्वल स्थान मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सोहम सिंग याने २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकांची कमाई केली. तसेच ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत केतन सुरवडे, पलक्ष केणे, प्रिन्स जाधव आणि श्रवण मिरकुटे या चौघांनी उत्कृष्ट समन्वय व वेगाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले.
या यशामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षक मितेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, इंडोनेशियातील स्पर्धेतही पदकांची कमाई करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या या पाच खेळाडूंच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.