फटाक्यांच्या वादातून दोन गटांत मारहाण

फटाक्यांच्या वादातून दोन गटांत मारहाण
Published on: 

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : पूर्वेकडील जुने अंबरनाथ गावातील गायकवाडपाडा येथे फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीत झाले. ३० ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रतीक सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरासमोर एक तरुण फटाके वाजवत होता. घरासमोर फटाके वाजवण्यास सोनवणे यांनी मज्जाव केल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी मागून येत सोनवणे यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. याप्रकरणी नैतिक जाधव, उमेश जाधव, दीपक गायकवाड आणि राज गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, उमेश जाधव यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा घरासमोर फटाके वाजवत असताना प्रतीक सोनवणे यांनी त्याला मारहाण केली. याबाबत जाब विचारण्यासाठी जाधव गेले असता, आरोपींनी त्यांना दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रतीक सोनवणे, दिलीप सोनवणे, आर्यन सोनवणे आणि प्रदीप सोनवणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.