पाणीपुरवठा याेजनांना पुन्हा वीज

पाणीपुरवठा याेजनांना पुन्हा वीज
Published on: 

पाणीपुरवठा याेजनांना पुन्हा वीज

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

मुंबई, ता. १ : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबत राज्य सरकारने महावितरणला निर्देश दिले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार थकीत वीजबिलांमुळे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची जोडणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमानुसार एक महिन्याच्या वीजबिलाएवढी सुरक्षा ठेव आणि पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी नियमानुसार जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजजोडणी देण्याचे निर्देशही महावितरणला देण्यात आले आहेत. तसेच थकबाकीमुळे नवीन वीजजोडणी प्रलंबित असलेल्या योजनांनाही तातडीने जोडणी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

नियमित बिल भरण्याची अट
वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित वीजबिल भरावे लागणार आहे. या वीजबिलांचा भरणा जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून करण्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.