आश्रमशाळेत आपुलकीचा दीपोत्सव

आश्रमशाळेत आपुलकीचा दीपोत्सव
Published on: 

आश्रमशाळेत आपुलकीचा दीपोत्सव

‘माझी दिवाळी, माझ्या विद्यार्थ्यांसोबत’ उपक्रम

कासा, ता. १ (बातमीदार) : घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने कांदरवाडी येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत शुक्रवारी (ता. ३०) ‘दीपोत्सव २०२६ – माझी दिवाळी, माझ्या विद्यार्थ्यांसोबत’ हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणूच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी यांनी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्याशी स्नेहसंवाद साधला.

आश्रमशाळेतील विद्यार्थी हे केवळ विद्यार्थी नसून शालेय कुटुंबाचाच एक भाग आहेत, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेम, जिव्हाळा आणि मायेचा सहवास मिळावा, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनन्या रेड्डी म्हणाल्या, ‘‘आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी डोळ्यांतील स्वप्ने कधीही विझू देऊ नका. मनापासून शिक्षण घ्या, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. घरापासून दूर आहात म्हणून स्वतःला एकटे समजू नका. तुमच्यावर प्रेम करणारी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणारी अनेक माणसे तुमच्या पाठीशी आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने आयुष्यातील अंधार दूर होवो आणि तुमच्या स्वप्नांना यशाचे पंख लाभोत,’’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या वेळी संशोधन सहाय्यक जगदीश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीनाथ थोंबाळे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अरुण शेटे यांच्या संकल्पनेतून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.