स्वच्छतेत विद्यार्थ्यांचा सहभाग

स्वच्छतेत विद्यार्थ्यांचा सहभाग
Published on: 

स्वच्छतेत विद्यार्थ्यांचा सहभाग
जुहूगाव चौपाटीवर विशेष मोहीम; पथनाट्यांतून कचरा व्यवस्थापनाचा संदेश
नेरूळ, ता. १ (बातमीदार) : स्वच्छ नवी मुंबई अभियानांतर्गत वाशी येथील जुहूगाव चौपाटी मिनी सी-शोअर परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फादर ॲग्नेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महापालिका कर्मचारी आणि स्वच्छताकर्मींच्या सहकार्याने या उपक्रमात सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. त्याचबरोबर पथनाट्यांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत दैनंदिन कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून नियमित स्वच्छतेसोबतच शहरातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यानुसार जुहूगाव चौपाटी परिसरात विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या स्वच्छताकर्मींना सहकार्य केले. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिकांचीही आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यासाठी पथनाट्य या प्रभावी माध्यमाचा वापर करण्यात आला. कलावंतांच्या समूहाने वाशी रेल्वे स्थानकासह विभागातील वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर केली. मनोरंजनातून स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांना कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले.

लोकसहभागावर भर
स्वच्छ नवी मुंबई अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक पातळीवर अशा मोहिमा आणि जनजागृती उपक्रम नियमित राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी सहभागी होऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.