

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
------------------------
आता मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा
राम पूर्णेकर ः पूर्णेकर हत्येच्या पुराव्यांबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी कुटुंबीयांचा पाठपुरावा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यात त्यांनी हत्या प्रकरणातील उपलब्ध पुरावे, तपासाच्या अनुषंगाने समोर आलेल्या बाबी आणि ठाण्यातील सद्यःस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच राजेंद्र शिंदे यांच्याबाबतही चर्चा केल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडूनच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांना राम म्हणाले, की बाबांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली, त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ठाण्यात नेमके काय सुरू आहे, तपासाच्या अनुषंगाने कोणत्या बाबी समोर आल्या आहेत आणि आमच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे कोणते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना दाखवले. ही चर्चा अत्यंत शांत वातावरणात झाली. बंद दाराआड काही वेगळी चर्चा झाली, असे काहीही नव्हते. मनातील भावना आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या घडामोडी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. २९ सप्टेंबरला हत्या झाल्यापासून आपण मुख्यमंत्र्यांकडूनच न्यायाची अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे त्यांची भेट घेणे महत्त्वाचे होते, असे राम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.