सह्याद्री नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

सह्याद्री नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ
Published on: 

म्हाडा कॉलनीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी
५० लाखांच्या निधीतून कामे सुरू
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील सह्याद्रीनगर येथील म्हाडा कॉलनीतील रस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या परिसरात ५० लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकतेच या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून यापूर्वीही सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवि पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका प्रमिला पाटील, तनुजा वायले तसेच नगरसेवक किरण भांगले आणि रूपेश सकपाळ हे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

याच पाठपुराव्यातून म्हाडा कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमुळे परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला परिसरातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या वेळी रवि पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यास शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.