कीर्तनकाराची अपघात रोखण्यासाठी धडपड

कीर्तनकाराची अपघात रोखण्यासाठी धडपड
Published on: 

कीर्तनकाराची अपघात रोखण्यासाठी धडपड
सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम

मोखाडा, ता. २ (बातमीदार) : वाहनांचा वेग नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर गतिरोधक उभारले जातात. मात्र, या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने तसेच त्याबाबत सूचनाफलक लावलेले नसल्याने रात्रीच्या वेळी ते गतिरोधक वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. परिणामी अपघात रोखण्यासाठी उभारलेले गतिरोधकच अपघातांना निमंत्रण देत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मोखाड्यातील कवी, व्यंगचित्रकार आणि कीर्तनकार राजेंद्र कटिलकर यांनी स्वतः पुढाकार घेत गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

मोखाड्यातील मुख्य रस्त्यांसह गावपाड्यातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी त्यावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. काही ठिकाणी गतिरोधक असल्याचे दर्शविणारे फलकही नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसून, अचानक ब्रेक लावल्याने किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडत आहेत. विशेषतः वळण, शाळा आणि झाडांच्या सावलीत असलेले गतिरोधक अधिक धोकादायक ठरत आहेत.

ही समस्या केवळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून न देता त्यावर स्वतःच्या परीने उपाय करण्याचा निर्णय कटिलकर यांनी घेतला. जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील गावोगावी ते भजन, कीर्तन आणि प्रवचनासाठी जात असतात. या आध्यात्मिक प्रवासात आता त्यांनी सामाजिक उपक्रमाचीही जोड दिली आहे. गावोगावी जाताना पांढऱ्या रंगाची बादली सोबत ठेवून, ज्या ठिकाणी गतिरोधकांवर पट्टे नाहीत, तेथे स्वतःच्या खर्चाने पट्टे मारण्याचे काम ते करीत आहेत. विशेष म्हणजे आध्यात्मिक कार्य, संसार आणि व्यवसाय सांभाळताना मिळणारा वेळ ते या उपक्रमासाठी देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.