

दहा वर्षांनंतर अंतोरे धरणाच्या देखभालीला मुहूर्त
दुष्काळी स्थितीमुळे धैर्यशील पाटील यांचा पुढाकार; १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
पेण, ता. २ (वार्ताहर) : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंतोरे येथील धरणाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात पावसाचे पाणी अडविण्यासाठी दरवर्षी केले जाणारे काम गेल्या १० वर्षांपासून रखडले होते. हे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी पुढाकार घेतला असून, जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ३०) संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची संयुक्त पाहणी केली. या वेळी गीतांजली मंडलिक, रत्नदीप वासनिक आणि संजय जाधव उपस्थित होते. रखडलेले काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या धरणातील पाण्याचा उपयोग पेण शहरासह तारनखोप, अंतोरे, नवघर, सपोली बेडी आणि वरेडी परिसरातील शेतीसाठी होतो. विशेषतः भाजीपाला लागवडीसाठी या पाण्याचा उपयोग होतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाणी अडविण्याच्या कामाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे १० वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लागल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिंचनासाठी आशादायी पाऊल
या पाहणीवेळी सरपंच अमित पाटील, माजी सरपंच रोहिदास पाटील, राजा पाटील, संदेश पाटील यांच्यासह अंतोरे, नवघर, सापोली आणि वरेडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. धरणाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.