केडीएमसी क्षेत्रात सुका कचरा संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केडीएमसी क्षेत्रात सुका कचरा संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on: 

सुका कचरा संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
केडीएमसीच्या २५ केंद्रांवर नागरिकांची गर्दी
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेल्या ‘पहिला रविवार – सुका कचरा’ या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील २५ संकलन केंद्रांवर जवळपास ७०० नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी प्लॅस्टिक, कापड, काचेच्या बाटल्या, ई-कचरा, थर्माकोल आणि जुन्या फर्निचरसह विविध पुनर्वापरयोग्य वस्तू जमा करण्यात आल्या.

महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ही मोहीम राबविण्यात येते. यासाठी महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी महिनाभर घरात वेगळा साठवलेला सुका कचरा या केंद्रांवर जमा करायचा असून, त्यानंतर तो पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतो.

डोंबिवलीतील गणेश मंदिर, महापालिकेचे विभागीय कार्यालय, टिळकनगर आणि रोटरी भवन यांसह विविध केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वस्तू जमा केल्या. कचरा थेट फेकून देण्याऐवजी त्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठी देण्याची सवय नागरिकांमध्ये रुजू लागल्याचे या प्रतिसादातून दिसून आले.

दरम्यान, आयुक्त अभिनव गोयल यांनी विविध संकलन केंद्रांना भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. ‘वापरा आणि फेका’ या सवयीऐवजी ‘वापरा, साठवा आणि हस्तांतरित करा’ ही संकल्पना नागरिकांमध्ये रुजत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ऊर्जा फाउंडेशन, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रोटरी क्लब आणि निर्मल फाउंडेशन या संस्थांच्या सहभागाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.