

ग्रामीण विकासासाठी आठ कोटींचा निधी
सहा गावांत रस्ते, पाणीपुरवठा अन् शाळांच्या कामांना प्रारंभ
पनवेल, ता. २ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी रायगड जिल्हा परिषद विकास निधी आणि जिल्हा परिषद सदस्य कमळा एकनाथ देशेकर यांच्या निधीतून आठ कोटी २८ लाख ३० हजार रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रविवारी (ता. १) खानाव, मोर्बे, चिंचवली, वावंजे, चिंध्रण आणि नितळस परिसरातील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य अरुण भगत आणि जिल्हा परिषद सदस्य कमळा एकनाथ देशेकर यांच्या हस्ते हे सोहळे पार पडले. भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवली तर्फे तळोजा ते शिरवली तर्फे तळोजा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी पाच कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. वावंजे येथील रुग्णालयाजवळील मुख्य रस्त्यासाठी दोन कोटी, तर वावंजे-मानपाडा मार्गावरील राईस मिल परिसरातील काँक्रीटीकरणासाठी दोन लाख ३० हजार रुपयांची तरतूद आहे.
खानाव येथे अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रुपये मंजूर असून, १० लाख रुपये खर्चून उभारलेल्या स्मशानभूमी निवारा शेडचे लोकार्पण करण्यात आले. मोर्बे येथील आठ लाख रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. चिंध्रण येथील रस्त्यासाठी १० लाख, तर नितळस येथील नवीन शाळेसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मूलभूत सुविधांना बळ
या कामांमुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. स्थानिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.