पर्यावरण संवर्धनाचा सप्ताह

पर्यावरण संवर्धनाचा सप्ताह
Published on: 

पर्यावरण संवर्धनाचा सप्ताह

पालघर जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम

लघर, ता. २ (बातमीदार) : पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली रुजविण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून जिल्हाभरात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि प्लॅस्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामपंचायतींपासून शाळा, महिला मंडळे आणि युवक संघटनांपर्यंत विविध घटकांच्या सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भारताच्या २०२६ मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभरात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मिशन लाईफ’च्या सात प्रमुख संकल्पनांवर आधारित या अभियानातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित वापर आणि दैनंदिन जीवनशैलीत पर्यावरणपूरक बदल घडविण्यावर भर दिला जाणार आहे.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला आळा घालणे, ई-कचऱ्याची निर्मिती कमी करणे आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन यासाठी विशेष जनजागृती केली जाणार आहे. घरगुती कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण या त्रिसूत्रीचा प्रसारही करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत नागरिकांना माहिती देऊन कचरा व्यवस्थापनात लोकसहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय घरगुती सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शासकीय कार्यालयांचे परिसर आणि जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावर लोकसहभागातून या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.