

मुंबई, ता. ३ : कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शताब्दी रुग्णालय येथे रुग्णांसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आता रुग्णांना यूपीआय तसेच अन्य डिजिटल माध्यमांतून उपचार शुल्क भरता येणार आहे. त्यामुळे रुग्णांची रोख रकमेच्या कटकटीतून सुटका झाली आहे.
आतापर्यंत ओपीडीची नोंदणी पावती घेणे किंवा अन्य शुल्क भरण्यासाठी रुग्णांना रोख रकमेवर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा सुट्टे पैसे नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. शुल्क भरण्याच्या काउंटरवरही गर्दी होत असल्याने रांगेत बराच वेळ थांबावे लागत होते. डिजिटल पेमेंटमुळे या प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.
सुविधेचा विस्तार करण्याचे नियोजन
महापालिका रुग्णालय प्रशासनाकडून या सुविधेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. आगामी काळात आंतररुग्ण विभागातील दाखल रुग्णांचे शुल्क, प्रयोगशाळेतील विविध तपासण्या तसेच औषध विभागातील देयकांसाठीही ऑनलाइन पेमेंट सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांश आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचा मार्ग मोकळा होईल.
ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे रुग्णांना शुल्क भरणे अधिक सोपे झाले आहे. यापुढे शुल्क भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठीही नियोजन सुरू आहे. रुग्णालयातील वॉर्डमध्ये क्यूआर कोड किंवा पेमेंट मशीन उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना वॉर्डमधूनच शुल्क भरता येईल.
- डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय, कांदिवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.