

सेवा संस्थांच्या प्रश्नांवर तोडगा काढणार
महापालिकेशी संबंधित विषयांसाठी संयुक्त बैठकीचे दरेकरांचे आश्वासन
मुंबई, ता. ३ ः मुंबईतील सेवा संस्थांच्या महापालिकेशी संबंधित सर्व प्रलंबित विषयांसंदर्भात येणाऱ्या १५ दिवसांत महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. मुंबईतील सेवा संस्थांतर्फे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, विनोद बोरसे, आनंदराव गोळे, नितीन बनकर, अनिल गजरे, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, संतान बारजस्कर, भाई सावंत, सहदेव सावंत, ऍड. सौरभ काटकर, विजय केदारे, विजय शेलार, आनंदराव माईंगडे, प्रकाश मेस्त्री, जयंत शिरीषकर, विठ्ठल वाळुंज, प्रमोद तायडे, गंगाधर शेळके, हेमंत दळवी, विजय जाधव, अजय बागल, प्रकाश सोसे यांसह मजूर सहकारी संस्था व सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आमदार दरेकर म्हणाले की, प्रतीवर्षी नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील बेरोजगार सहकारी संस्थांचे मेळावे होतात. आपण सर्वांनी एकत्र येणे व एकत्रित येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्यांवर चर्चा करून सोडवणूक करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे हा या मेळाव्यांचा उद्देश असतो. तशाच पद्धतीने आज दिवाळीनिमित्त स्नेहमेळावा संपन्न होत आहे.
‘ड’ वर्गात आणण्याचा प्रयत्न
आपले काही प्रश्न निकाली निघालेत तर काही प्रश्न प्रलंबित आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला ‘ड’ वर्गात आणण्याचा प्रयत्न निश्चित करू. त्याचबरोबर मुंबई महापालिकेशी संबंधित सर्व विषयांसंदर्भात मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. याबाबत माझ्याकडे निवेदन द्या. मी महापौर आणि महापालिका आयुक्त यांना संयुक्त बैठक घेण्यास सांगेन व आपल्याला ही कामे कशी मिळतील यासाठी प्रयत्न करू, असेही आमदार दरेकरांनी आश्वस्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.