

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरात तब्बल १,६२३ जीन्स चोरीला गेल्याची तक्रार देणारा कारखानदारच या कथित चोरीच्या कटाचा सूत्रधार निघाला आहे. खिडकी तोडून चोरी झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हिललाईन पोलिसांनी उधळून लावला. तांत्रिक तपासातून या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी अंबरनाथमध्ये लपविलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उल्हासनगर कॅम्प पाचमधील प्रेमनगर टेकडी परिसरातील सह्याद्रीनगर येथे जीन्स पॅकिंग कारखान्यातून १,६२३ जीन्स चोरीला गेल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. २८ ऑक्टोबरला मध्यरात्री दोन ते पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी कारखान्याची खिडकी तोडून जीन्स चोरल्याची तक्रार कारखानदार फैज शेख यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात दिली होती. यामध्ये व्यापाऱ्यांनी पॅकिंगसाठी दिलेल्या अनुक्रमे ६०१, ६७२ आणि ३५० अशा एकूण १,६२३ जीन्सचा समावेश होता. मात्र, तपासादरम्यान तक्रारदाराच्या जबाबात आणि घटनास्थळावरील परिस्थितीत विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून चोरीचा बनाव उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या माहितीनुसार, शेख यानेच संपूर्ण माल अंबरनाथमध्ये लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी छापा टाकून सर्व १,६२३ जीन्स हस्तगत केल्या असून, खोटी तक्रार देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.