दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ठाणे एसीबी अधीक्षकांना मुदतवाढ

दोन पोलिस अधिकाऱ्यांसह 
ठाणे एसीबी अधीक्षकांना मुदतवाढ
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : राज्य सरकारने भारतीय पोलिस सेवा आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशात ठाणे शहरातील पोलिस उपायुक्तांसह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षकांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ, तर ठाणे ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती, तर एका नव्या पोलिस अधिकाऱ्याची ठाणे शहर पोलिस दलात प्रवेश झाला आहे.

सरकारच्या आदेशानुसार, ठाणे शहर पोलिस दलातील ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि ठाणे एसीबीचे अधीक्षक शिवराज पाटील यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांकडे सध्याची जबाबदारी कायम राहणार आहे. ठाणे ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड, अंबेजोगाई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी ठाणे शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती केली आहे. ठाणे नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षक जयंत जसबळे यांची ठाणे शहर पोलिस दलात प्रवेश झाला आहे.

दोघांची चर्चा सुरू
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील विशेष तपास पथकाचे प्रमुख अमरसिंह जाधव आणि ज्या हद्दीत गुन्हा घडला त्या हत्येचे तपास करणारे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांना मुदतवाढ दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.