

पणत्यांनी सजला कुंभारवाडा
दिवाळीसाठी पणत्या, मातीचे दिवे, लामणदिव्यांची विक्री; खरेदीसाठी गर्दी
धारावी, ता. ३ (बातमीदार) : दिवाळी सणासाठी लागणारे मातीचे दिवे, पणत्या, लामणदिव्यांनी धारावी कुंभारवाडा सजला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धारावी कुंभारवाड्यात दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या सणात लागणारे साहित्य बनवण्याची लगबग सुरू होते. दरवर्षीचे घाऊक विक्रेते ग्राहक आगाऊ ऑर्डर देऊन ठेवतात. त्याप्रमाणे माल बनवला जातो. सध्या साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.
मुंबईतील विविध विभागांतून तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील घाऊक विक्रेते इथून माल घेण्यास प्राधान्य देतात. तर किरकोळ ग्राहक आपल्या आवडीप्रमाणे दिवाळीत लागणाऱ्या पणत्या व दिवे खरेदी करतात. काही दिवसांवर दिवाळी आल्याने कुंभारवाड्यातील बाजारात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. अनेकदा व्यापाऱ्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही.
जसजशी दिवाळी जवळ येते तसतशी ग्राहकांची रीघ लागते. त्यामुळे व्यापारी सज्ज आहेत. घरातील जास्तीत जास्त सदस्य यासाठी वेळ काढून मदत करीत आहेत. अनेक जण मुंबईतील विविध विभागांत साहित्याची विक्री करण्यासाठी जातात. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने भरणा असतो.
या ठिकाणी साधी रंग न लावलेली पणती एक रुपयापासून ते लामणदिवे एक हजार रुपयांपासून पुढे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी अजून म्हणावा तसा विक्रीला वेग आला नसल्याचे सविता पोट्रीचे मालक नटवर किडेचा यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत किरकोळ विक्रीला वेग येईल, असे किडेचा यांनी सांगितले.
कलाकारांकडून खरेदी
धारावी कुंभारवाड्यातून सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार तसेच राजकीय पक्षांकडून मोठी खरेदी केली जाते. दरवर्षी दिवाळीत मोठी उलाढाल धारावी कुंभारवाड्यात होते. ही उलाढाल अधिक वाढावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याकडे दुकानदारांचा कल असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.