

गोठेघर-भंडार्लीत एनएमएमटी बससेवा सुरू
बस क्रमांक ३८ आजपासून प्रवाशांच्या सेवेत; रहिवाशांना दिलासा
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : गोठेघर-भंडार्ली येथील म्हाडा वसाहतीतील नागरिकांची अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली एनएमएमटी बससेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. उत्तरशिव गाव ते घणसोली डी-मार्ट या मार्गावर बस क्रमांक ३८ आजपासून सुरू होणार आहे. या सेवेमुळे वसाहतीतील नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गोठेघर-भंडार्ली म्हाडा वसाहतीत मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने रहिवाशांना दैनंदिन प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा अन्य वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागत होते.
या समस्येवर उपाय म्हणून वसाहतीतील नागरिकांनी एनएमएमटी प्रशासनाकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, बस क्रमांक ३८ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवासाची गैरसोय होणार दूर
उत्तरशिव गाव ते घणसोली डी-मार्ट या मार्गावरील बससेवेमुळे गोठेघर-भंडार्ली म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल. अनेक महिन्यांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने वसाहतीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.