फेरीवाल्यांची माहिती देण्याचे मोखाडा पोलिसांचे आवाहन

फेरीवाल्यांची माहिती देण्याचे 
मोखाडा पोलिसांचे आवाहन
Published on: 

मोखाडा, ता. ३ (बातमीदार) : सध्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याचे परिणाम म्हणून मालमत्तेचे गुन्हे त्यामध्ये मुख्यत्वे चोरी दरोडा, जबरी चोरी या प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना मोखाडा तालुक्यामध्ये काही प्रमाणात घडत आहेत. त्या रोखण्यासाठी मोखाडा पोलिसांनी तालुक्यातील गावपाड्यांत बाहेरून येणाऱ्या फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांची माहिती घेण्याचे आवाहन पोलिस पाटील, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना केले आहे.

अलीकडच्या काळात मोखाड्यात चोरी, जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याचा शोध मोखाडा पोलिस घेत आहेत. राज्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहेत. त्याचा परिणाम म्हणून चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी मोखाडा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावपाड्यांतील घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आपल्या गाव हद्दीत येणाऱ्या सर्व फेरीवाले, किरकोळ विक्रेते व फिरत्या व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांची सखोल चौकशी करावी. त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक व विक्रीच्या साहित्याचा तपशील ग्रामपंचायत नोंदवहीत अचूक नोंदवून घ्यावा. तसेच कोणाच्याही हालचाली संशयास्पद आढळल्यास सरपंच व सदस्यांनी तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी व आवश्यक प्रतिबंधक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी तालुक्यातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.