फटाक्यांच्या विक्रीवरून वाद

फटाक्यांच्या विक्रीवरून वाद
Published on: 

अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : फटाक्यांच्या विक्रीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना अंबरनाथ पश्चिमेतील बिमको नाका परिसरात घडली. या वादातून ३० वर्षीय तरुणाला लोखंडी पाइप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून, सचिन चव्हाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित चव्हाण (३०, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ पश्चिम) यांचा मित्र रोहन याचा आरोपींच्या कार्यालयाबाहेर फटाके विकण्यावरून वाद झाला होता. २ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास बिमको मैदान परिसरात हा प्रकार घडला. मित्रासोबत झालेला वाद मिटवण्यासाठी रोहित तेथे गेले असता, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. त्यानंतर रोहित आणि त्यांचे मित्र चिंचपाडा येथील गैबनशहा दर्गा परिसरात गेले. त्यावेळी सचिन आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून तेथे आले. रोहित यांना पुन्हा बिमको मैदानावर नेले. तेथे पोहोचताच त्यांच्यावर लोखंडी पाइप तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.