विरोधकांकडून राजकीय वातावरण तापवले जातेय

विरोधकांकडून राजकीय वातावरण तापवले जातेय
Published on: 

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
़़़़़़़़़़़़़़़़़
विरोधकांकडून वातावरण तापवले जातेय
मीनाक्षी शिंदे यांची राम यांच्या संरक्षणाची मागणी; पोलिस आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता नव्या दिशेने वळला आहे. आतापर्यंत विरोधकांच्या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राम पूर्णेकर यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजकीय वातावरण चिघळवून घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करीत त्यांनी राम आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी मयताचे सुतक आता राहिले नसून, इव्हेंट झाल्याचे वक्तव्य करीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाविषयी भाष्य केले.
पूर्णेकर यांच्या हत्येवरून मीनाक्षी आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात असून, त्यांच्या अटकेसाठी दबाव वाढवला जात आहे. याला उत्तर देताना शिंदे यांनी विरोधक राजकीय हेतूने या प्रकरणाचा वापर करीत असल्याचा आरोप केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब आणि राजन विचारे यांच्यासह ठाकरे गट, काँग्रेस व मनसेचे नेते या घटनेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे शहरातील वातावरण बिघडत असून, चार-पाच दिवसांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

पूर्णेकर कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
राम पूर्णेकर हे वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असताना त्यांना राजकीय संघर्षात ओढले जात आहे. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले काही आरोपी उपस्थित असल्याचा दावाही मीनाक्षी शिंदे यांनी केला. या पार्श्वभूमीवर राम किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या बाबतीत अनुचित घटना घडण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबाला पोलिस संरक्षण देऊन त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.