

मुंबई, ता. ४ : आयुष वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या आयुर्वेद-बीएएमएस, होमिओपॅथी-बीएचएमएस व युनानी-बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमांच्या राज्यात २०४ वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार ७५० जागांपैकी सात हजार ११६ जागेवर पहिल्या व दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला असून, पाच हजार ९६१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ६७३ जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील.
आयुर्वेद-बीएएमएस या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात १३९ वैद्यकीय महाविद्यालयात नऊ हजार ३०३ जागांपैकी पाच हजार ०४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत चार हजार ०८५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १७७ जागा रिक्त आहेत. यामध्ये सहा शासकीय महाविद्यालयांत ३२९, शासकीय अनुदानित, महापालिकेच्या १७ महाविद्यालयांत ८६० व विनाअनुदानित ११६ महाविद्यालयांत २,८९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
होमिओपॅथी-बीएचएमएस या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात ५७ वैद्यकीय महाविद्यालयांत चार हजार ०१९ जागांपैकी १ हजार ८४७ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत एक हजार ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८९ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन शासकीय महाविद्यालयांत ८२ व विनाअनुदानित ५५ महाविद्यालयांत १,६०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा
युनानी-बीयुएमएस या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीत राज्यात आठ वैद्यकीय महाविद्यालयांत ४२८ जागांपैकी २२८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत १९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये सात जागा रिक्त आहेत. यामध्ये शासकीय अनुदानित, महापालिकेच्या तीन महाविद्यालयांत २७ व विनाअनुदानित पाच महाविद्यालयांत १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे.
ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी ४ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.