एक कोटीच्या कथित खोट्या खंडणी गुन्ह्याचा पोलिसांनाच फटका

एक कोटीच्या कथित खोट्या खंडणी गुन्ह्याचा पोलिसांनाच फटका
Published on: 

प्राधिकरणाचा पोलिसांना दंड
सुनावणीला दांडी मारणाऱ्यांवर ताशेरे
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर)ः एक कोटीच्या कथित खोट्या खंडणी गुन्ह्याप्रकरणी हिललाइन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाने ताशेरे ओढले आहेत. सुनावणीला गैरहजर राहणे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना महागात पडले आहे. प्राधिकरणाने त्यांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या विरोधात डिसेंबर २०२४ मध्ये हिललाइन पोलिस ठाण्यात एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र उल्हासनगरमधील कथित टीडीआर घोटाळा उघडकीस आणल्याच्या द्वेषातून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. पुढे गुन्हे शाखेच्या तपासानंतर सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये गुन्हा खोटा असल्याचे नमूद करून ‘बी फायनल’ अहवाल सादर करण्यात आला. याप्रकरणी संबंधित पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी स्वप्नील पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली होती.
बुधवारी (ता. ४) झालेल्या सुनावणीला हिललाइन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गव्हाणे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याने प्राधिकरणाने नाराजी व्यक्त केली. सुनावणीबाबत गांभीर्य न दाखविल्याचा ठपका ठेवत संबंधितांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.